पशू, पक्षी, प्राण्यांच्या अद्भूत आणि अजब विश्वात घेऊन जाणारं हे आगळवेगळ लेखन. डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या वन्य प्राण्यांच्या कहाणीचा हा दुसरा भाग आहे. येथे नेगली भेटते ती बाळंत झालेली. तिच्याबरोबर हेमलकशात राहणारे आणखीही प्राणी भेटीला येतात. मगर, सिंह, बिबट्या, विषारी-बिनविषारी साप, घुबड-सर्पगरुड, सरडे, अजगर, नीलगायी, खारी, कोल्हे, तरस, अस्वलं, नाग, साप, सायाळी, माकडं, खवल्या मांजर अशा कितीतरी प्राण्यांनी ही दुनिया रंगीत झाली आहे. या प्राण्यांचं गुण्यागोविंदान राहण, त्यांचं खाणं, त्यांचे आजार, मादिंच गर्भारपण असं वेगळंच चित्तथरारक विश्व वाचकासमोर उलगडत जातं. या रोमहर्षक अनुभवांतून साकारलेलं हे पुस्तक हेमलकशाच्या प्रकल्पाचं महत्वही अधोरेखित करतं.